आनंदी लॉ कॉलेजमध्ये “ग्रीन कॅम्पस सेल” ची स्थापना व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर – आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,आनंदी लॉ कॉलेजमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने “ग्रीन कॅम्पस सेल” ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले.
या वेळी संस्थेचे चेअरमन प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई, आनंदी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. किल्लेदार, उपप्राचार्य डॉ. राहुल अडनाईक, आनंदी लॉ कॉलेजचे प्रा. राकेश शिंदे, प्रा. रवींद्र करपे, प्रा. नम्रता पोतदार तसेच विधी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी बोलताना सचिव डॉ विद्या देसाई यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
“ग्रीन कॅम्पस सेल” च्या माध्यमातून कॉलेज परिसरात हरित वातावरण निर्माण करण्याचे तसेच पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन आनंदी लॉ कॉलेजच्या ग्रीन कॅम्पस सेलच्या सदस्यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



