हायकोर्ट प्रॅक्टिस अँड प्रोसीजर - एक दिवसीय कार्यशाळेत सहभाग​

कोल्हापूर – आज दिनांक ९/८/२०२५ रोजी  आनंदी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी
“हायकोर्ट प्रॅक्टिस अँड प्रोसीजर”
या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत सहभाग घेतला.
ही कार्यशाळा पुढारी समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयीन कामकाज, प्रॅक्टिसचे तंत्र, अर्ज व याचिका प्रक्रिया, तसेच वरिष्ठ वकिलांचा मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कायदेशीर ज्ञानात व व्यावहारिक कौशल्यात भर पडली.